कुष्ठ सेवा संस्थेच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण थांबविण्याची कुष्ठरुग्णांची मागणी पालिका आयुक्तांसह पोलीस स्टेशनला दिले पत्र


कल्याण : कल्याण पूर्वेतील कचोरे, हनुमान नगर येथे कुष्ठ सेवा संस्थेच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण थांबविण्याची मागणी कुष्ठरुग्णांनी केली असून याबाबत त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जे प्रभाग सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणी टिळक नगर पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अजय आफळे यांना निवेदन दिले आहे. 


हनुमान नगर कुष्ठ वसाहतीसमोर असलेल्या संस्थेच्या मालकी हव्काच्या मोकळ्या जागेवर संस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सत्यभामा पवार, साईनाथ गायकवाड आणि लखन गायकवाड यांनी अनधिकृतपणे घरे बांधून कब्जा केला असल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संस्थेच्या वतीने महानगरपालिकेत तसेच टिळक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी कागदपत्रे सादर करून तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी प्रत्यक्ष जागोवर येऊन प्रकरणाचा योग्य तपास करून कुष्ठकग्णांना मदत केली आहे.


सदरची मोकळी जागा ही डिपी प्लॅनमध्ये येत असून त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही. तिथे कुष्ठरुग्णांना बसण्याकरीता एक छोटस उद्यान क्हावेयासाठी संस्था प्रयत्नशील आहे. तसेच संस्थेच्या वतीने या मोकळ्या जागेवर महापालिकेचा फलक सुद्धा लावण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने या मोकळ्या जागेवर पत्रे लावून जागा सुरक्षित केली आहे. ते लावलेले पत्रे काढण्यासाठी आणि सदर जागा मिळवण्यासाठी गायकवाड  आणि पवार कुटुंबीय कुष्ठ सेवा संस्थेची बढनामी करत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे.


या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे नरसिंग गायसमुद्रे, जयपाल कांबळे, साहिल रेवडी, कादर रेवडी हे वारंवार वसाहतीमध्ये येवून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकून दमदाटी करत असल्याचे कुष्ठ सेवा संस्थेचे अध्यक्ष अजय कोठारे आणि सचिव संतोष वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान याबाबत संबधितांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही

Post a Comment

0 Comments