चंद्रकांत सास्ते राज्यस्तरीय महाराष्ट्र बिझनेस आयकॉन आँवर्डने सन्मानित

      


कल्याण : कल्याण मध्ये माय मार्टच्या माध्यमातून यशस्वी व्यवासायिक म्हणून नावलौकिक असलेले मराठ मोळे चंद्रकांत सास्ते यांना नुकताच राज्यस्तरीय यशस्वी महाराष्ट्र बिझनेस आयकॉन आँवर्ड  प्राप्त झाला.     

                                       

शेतकरी कुटुंबात सातारा येथील  कासारवाडीत जन्म झालेल्या चंद्रकांत सास्ते यांचे शिक्षण माण तालुक्यातील महिमानगड येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. १२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या चंद्रकांत यांना   सन २००२ ला कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेजच्या  सावंत सरांनी एकदा भाषणात  सांगितले होते की मला वाटतं की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने एक एक उद्योग चालू करावा. तेंव्हा पासूनच त्यांनी   एक विचार केला होता की आपलं छोटासा का होईना  दुकान चालु करूया कसलाच अनुभव नाही पण काहीतरी मोठे करायचं म्हणून छोटी सुरुवात कल्याणा पश्चिमेतील मिलिंद नगर परिसरात छोटखानी    किराणा दुकान २००६ ला पहिले दुकान चालु केलं.

 

अगदी मूग डाळतुरडाळ मधील फरक समजत नसताना पण विकायच कस हे  सास्ते यांनी शाळेत असताना  आजोबा याच्या बरोबर गावाला आठवडा बाजार मध्ये भाजी विक्रीचे धडे घेतले होते.  त्यामुळे तो अनुभव पाठीशी होता. पण वय अवघ्या २० वर्षी परिस्थिती गरीब त्यामुळे कॊणी पैसे देईना. पण प्रयत्न चिकाटी मुळे भांडवलासाठी पैसे मिळाले आणि छोटखानी किराणा दुकान चालु झाले. खूप कमी नफा आणि जास्त विक्री  असा फंडा सुरु ठेवत सन २००७   दुसरे दुकान चालु केलं  कठोर मेहनत घेतली. आणि सन २०१४ला  पहिले वहिले  सुपर मार्ट  माय मार्ट सुरु केले. सन २०१५ ते  २०१७ दोन  वर्षात दोन माय मार्ट  चालु झाली. ३ री भव्य दिव्य शाखा देखील ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू होणार असल्याने जिद्दग्राहक संवादकठोर कष्ट या जोरावर एका मराठ मोळ्याने किरणा मार्ट च्या माध्यमातून व्यवासायिक म्हणून नावारुपाला येत प्रेरणा दिली आहे.  यामुळे सास्ते यांची योगीधाम व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.                                 

 

  नाशिक येथे संपन्न झालेल्या पारितोषिक वितरणात चंद्रकांत सास्ते यांना राज्य स्तरीय महाराष्ट्र बिझनेस  आँवर्ड ने सन्मानित करण्यात आले. धेय्यप्रामाणिकपणाचिकाटी आणि मेहनत या मुळे एक व्यवसायिक म्हणून स्पर्धेच्या युगात स्थिरवलो असुन या मार्ट च्या माध्यमातून २० जणांना रोजगार मिळाला असल्याचे समाधान असुन माझी पत्नी  पुष्पा सास्ते   संसाराचा गाडा संभाळत मला मार्ट मधील कामाचा व्याप संभाळत असल्याने मदत होत आहे. कोवीड काळात योग्य दरात ग्राहकांना होम डिलिव्हरी देत "ग्राहक राजाला" सेवा पुरवित संवाद साधल्याने व्यवसायात वुध्दीचे दिशेने वाटचाल झाली. मराठी तरूणांनी जास्तीत जास्त व्यवसाय संधीत येऊन संधीचे सोने करावे. ग्रामीण भागातील तरूणांनी शेती बरोबर पूरक व्यवसाय करीत आपला विकास करीत आपल्या गावाचा विकास करण्याकडे लक्ष दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया सास्ते यांनी दिली.

Post a Comment

0 Comments