डोंबिवलीत लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस बळ कमी एसीपी सुनील कुराडे


डोंबिवली ( शंकर जाधव ) लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस बळ कमी आहे. आता महिला आरक्षणामुळे भार वाढला आहे. एकट्यादुकट्या अविवाहित महिलांना कधीही आणि कुठेही पाठवता येत नाही. चारही बाजूला ज्वेलर्सची दुकाने आहेत. मात्र सगळीकडे पेट्रोलिंग करणे शक्य होणार नाही.सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पोलिस कार्यरत आहेत.


मात्र तरीही नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. इतर कोणत्याही पोलिस ठाण्यातून पोलिस कारवाईसाठी आले, तर प्रथम त्यांच्यासोबत स्थानिक पोलिस असणे आवश्यक आहे. याविषयी त्यांना जाब विचारू शकता, असे डोंबिवली विभागाचे नवनियुक्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनशी संवाद साधताना सांगितले.
   

 डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनच्यावतीने रामनगर पोलिस ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, असोसिएशनचे दिलीप कोठारी, विकास कोठारी, विमल संचेती, राकेश परमार, महावीर बडाला, सुनील जाधव, सचिन गोडके, प्रेमकुमार प्रजापती, पुखराज इटोडियान, सुरेश सिंघवी, पारस बडाला, खयीलाल धोका, संदीप सिंघवी, लोकेश बडाला, जीवन कोठारी, दिनेश खरोटे, लोकेश सोनी, उत्तम कोठारी, विकास मेहता यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
    

 या सभेत बोलताना एसीपी कुराडे म्हणाले की, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्वेलर्सनी सतर्क राहण्याची गरज आहे. कॅमेरे दुकानाबाहेर लावावेत आणि तुमच्या दुकानात कोण व्यक्ती जास्त वेळा येत असते, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रत्येक दुकानावर तुमच्या जवळच्या पोलिस ठाण्याचा फोन नंबर असला पाहिजेत. दुकानाबाहेर थांबलेल्या दुचाकी किंवा कारवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.


रस्त्यावरील वाहतूक सुरळीत असल्याने गुन्हे करून पळून जाण्याची गुन्हेगारांना संधी मिळू शकते. गस्तीसंदर्भात बोलताना एसीपी कुराडे म्हणाले की, दागिने विकत घेतल्यानंतर त्याची कस्सून चौकशी करूनच खरेदी करा, काही चुकले तर लगेच पोलिसांना सांगा. सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तिजोरीचाही वापर केला पाहिजे, असे आवाहन एसीपी कुराडे यांनी शेवटी बोलताना केले.
   

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल इटोडिया यांनीही लवकरच या गोष्टींची अंमलबजावणी करण्याबाबत बोलून सूचनाही दिल्या. पोलिसांचे सहकार्य आम्हाला नेहमीच लाभले आहे. सर्वजण आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करतात. असेच तुमचे सहकार्य मिळत राहो, असे इटोडिया यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments