कल्याण : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा १२ ते १८ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे सतीश कोचरेकर यांनी दिली. यावेळी संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत, ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल हे उपस्थित होते.
गोवा येथे गेल्या १० वर्षांपासून होणार्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करणे प्रारंभ झाले. या दहाव्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘हिंदु राष्ट्रात आदर्श राजव्यवहार कसा असावा ?’, याविषयी दिशादर्शन करण्यासाठी यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसदे’चे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनातील तीन दिवस ‘हिंदु राष्ट्र संसद’ घेतली जाणार आहे. त्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि संवैधानिक मार्ग’, ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ आणि ‘हिंदु शैक्षणिक धोरणांचा अवलंब कसा करावा ?’ या विषयांवर तज्ञ मान्यवरांकडून विस्तृत चर्चा होणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे हे अधिवेशन प्रत्यक्ष होऊ शकले नाही. २०२० मध्ये ‘ऑनलाईन’ अधि
या अधिवेशनात प्रामुख्याने ‘काशी येथील ज्ञानवापी मशीद’, ‘मथुरा मुक्ती आंदोलन’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’, ‘काश्मिरी हिंदूंचा नरसंहार’, ‘मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण’, ‘हिजाब आंदोलन’, ‘हलाल सर्टिफिकेट एक आर्थिक जिहाद’, ‘हिंदूंचे संरक्षण’, ‘मंदिर-संस्कृती-इतिहास यांचे रक्षण’, ‘धर्मांतर’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे सतीश कोचरेकर यांनी सांगितले.
0 Comments