सामान्य कार्यकर्त्याची दखल घेण ही पु ल कट्ट्याची खासियत - कवी अरुण म्हात्रे


कल्याण :  मानव सहाय्यक सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच पु ल कट्ट्याचे संयोजक आणि गजानन महाराज सेवा संस्था भोइरवाडीचे खजिनदार, तसेच कामा बिल्डींग फडके वाडा गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते त्याचप्रमाणे पोलीस मित्र आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याचे गणेशोत्सव मंडळाचे परीक्षक अशा विविध क्षेत्रात सक्रिय असणारे समाजसेवक संजय वाजपेयी यांच्या षष्टी पूर्ती  निमित्त जाहीर सत्कार कल्याणकर यांच्या वतीने पूल कट्टा नक्षत्र उद्यान कल्याण या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे बोलत होते. ते पुढे म्हणाले मी अनेकदा संजय वाजपेयी यांना पु ल कट्ट्याच्या विविध उपक्रमात तळमळीने व कोणतीही चीड चीड न करता सतत हसतमुखाने काम करताना पाहिले आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर नोकरी गेल्याने आलेल्या आर्थिक संकटा दरम्यानही त्यांनी आपल्या कामाचा वसा टाकला नाही ही बाब कौतुकास्पद आहे. अशा सामान्य कार्यकर्त्यांना हेरून त्यांचा सन्मान करणे ही पु ल कट्ट्याची खासियत आहे आणि त्याचेच फलित आजचा हा षष्ठपूर्ती सोहळा आहे.


  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार, अग्रवाल कॉलेजचे विश्वस्थ विजय पंडित, जेष्ट पत्रकार तुषार राजे, मोहम्मदिया स्कूलचे संस्थापक अध्यक्ष साद काझी, भोईरवाडी गजानन महाराज मंदिराचे प्रमुख अनंत ताटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाजपेई यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे व कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात संजय वाजपेई यांचा व त्यांची पत्नी वर्षा वाजपेयी यांचा पाहुण्याच्या हस्ते शाल श्रीफळ, साडी चोळीसौभाग्याचं लेणं देऊन तुतारीच्या निनादात जाहीर सत्कार करण्यात आला.


 तसेच वाजपेयी यांची गुळतुला करूनसन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  लता पालवे यांनी केले. तर प्रास्ताविक आणि सन्मान पत्र वाचन प्रा महेंद्र भावसार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रमेश करमरकर,  दत्ता केमबुळकरदामू काबराराजू गवळीप्रशांत म्हात्रे,संतोष पंडित,प्रशांत तोष्णीवाल, अम्मार काझी, डॉ गिरीश लटके, सुधीर चित्ते यांनी किशोर खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्या करिता संजय वाजपेयी यांचे नातेवाईकमित्र, हितचिंतक, चाहते व कल्याणकर नागरिक एका सामान्य कार्यकर्त्याच्या असामान्य बांधिलकीचा सन्मान करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments