पोलिओ व हर घर दस्तक लसीकरण मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे .... पालिका आयुक्त विजय कुमार म्हसाळ


भिवंडी, प्रतिनिधी  : महाराष्ट्रात  सर्वत्र 19 जून रोजी  पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार  आहे आपल्या परिवारातील शून्य ते पाच वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओचा डोस देऊन भिवंडी शहर व भारत पोलिओमुक्त करावयाचा आहे याकामी शहरातील सर्व नागरिकांना पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी आज झालेल्या पत्रकार वार्तालापात केले.


शहरात प्रत्यक्ष 406 पोलिओ केंद्रांवर पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे यामध्ये भिवंडी शहरातील एकूण 81 हजार 333 पोलिओ लाभार्थ्यांचा देण्याचे उद्दिष्ट आहे या सर्वांना पोलिओचा डोस द्यायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याच दिवशी घ्यायचा आहे व जे लाभार्थी राहतील त्यांच्याकरता दिनांक 20 ते  24 जून या दरम्यान घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण देण्यात येणार आहे तसेच एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, चेक पोस्ट नाका अशी एकूण 32 या ठिकाणी देखील लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.याकामी एकूण 206869 घराना भेटीचे उद्दिष्ठ तर 342 लसीकरण पथक काम करणार आहेत.यासाठी 1154 कर्मचारी वर्ग लागणार आहे. 


तसेच कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण,  अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे तसेच ज्येष्ठांना वर्धित लस देणे इत्यादी उपक्रम सुरू आहेत त्याच बरोबर  केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मिशन हर घर दस्तक मोहीम 2 शहरात सुरू झाली आहे. या मोहिमेत वय वर्ष 12 ते 14 वर आणि 15 ते 17 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. आता शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतर या लसीकरणाला गती देण्यात येणार आहे.


शालेय व महाविद्यालयीन स्तरावर 12 ते 18 वयोगटातील सर्व किशोरवयीन मुलांचे लसीकरण लसीकरण वर भर देण्याचा निर्णय घेण्यात आलेले प्रशासनाने घेतला आहे एक जुलैपासून हर घर दस्तक मोहीम राबविण्यात येणार आहे. प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक  उपाय योजना, 120  मायक्रोन पेक्षा  कमी जाडीच्या पिशव्या यावर बंदी याची माहिती दिली.


शहरातील सर्व प्रभाग समितीनिहाय नाले सफाई जवळपास 94 टकके पूर्ण झाली आहे, शहराकरिता  क्लस्टर विकास योजना शासनाकडे सादर करण्यात आलीअशी माहिती देखील पालिका आयुक्त विजयकुमार मसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

0 Comments