१०० टक्के नैसर्गिक रॉ मटीरिअल्सपासून निर्माण करण्यात आलेल्यापर्यावरणास-अनुकूल मॅट्रेसेस, मॅट्रेसेस टॉपर्स,उशा (पिलोज) व बेड लिनेन्स लॉन्च, ज्यामधून ग्राहकांना स्मार्ट टिकाऊ निवड करण्याची सुविधा
राष्ट्रीय, जून १३, २०२२ : भारतातील आघाडीचा स्लीप सोल्यूशन्स प्रदाता ब्रॅण्ड ड्युरोफ्लेक्स संशोधन व इनोवेशनच्या अग्रस्थानी आहे. ब्रॅण्डचा व्यापक प्रोडक्ट पोर्टफोलिओ प्रत्येक प्रकारच्या ग्राहकाच्या गरजांची पूर्तता करतो. मागील काही वर्षांमध्ये आपल्या गरजांची पूर्तता करण्यासोबत पर्यावरणासाठी उत्तम असलेल्या उत्पादनांचा शोध घेणा-या ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसण्यात आली आहे.
या ग्राहकांना त्यांच्या झोपेसाठी उत्तम सुविधेची निवड करण्यास मदत करण्यासाठी ड्युरोफ्लेक्सने मॅट्रेसेस व स्लीप अॅक्सेसरीजची त्यांची पर्यावरणास-अनुकूल श्रेणी – नॅच्युरल लिव्हिंगमध्ये सुधारणा व वाढ केली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ड्युरोफ्लेक्सने १०० टक्के नॅच्युरल लेटेक्स, रबरी कॉयर, कॉटन, टेन्सेल व एथिकोट अशा पूर्णत: नैसर्गिक रॉ मटीरिअल्सपासून बनवलेल्या मॅट्रेस, मॅट्रेस टॉपर्स, उशा (पिलोज) व बेड लिनेन्स सादर केले आहेत.
या श्रेणीतील उत्पादने एथिकली सोर्स केलेल्या टिकाऊ साहित्यापासून आणि कोणत्याही अवजड मशीनरीच्या हस्तक्षेपाशिवाय तयार केली जातात. या श्रेणीच्या उत्पादनासाठी वापरला जाणारा जीओएलएस प्रमाणित लेटेक्स कंपनीच्या केरळमधील स्वतःच्या रबर लागवडीतून मिळवला जातो. सध्या, ड्युरोफ्लेक्स हा जीओएलएस प्रमाणित लेटेक्स वापरणारा भारतातील एकमेव ब्रँड आहे.
रसायनमुक्त शुद्ध कापूस आणि बांबूचे कापड व्यक्तीचे आरोग्य व स्वास्थ्यासाठी अनुकूल आहेत. ते हायपो-एलर्जेनिक, स्पर्शास मऊ, नैसर्गिकरित्या लवचिक आणि श्वास घेण्यास अत्यंतयोग्य आहेत. मॅट्रेसमध्ये वापरण्यात येणारी नैसर्गिक कॉयर व्यक्तीला नैसर्गिकरित्या थंडावा देते. नैसर्गिक साहित्याच्या वापरामुळे ही श्रेणी अॅलर्जी, श्वसनाचे विकार असलेल्या, तसेच ज्यांना अधिक काळजीची गरज आहे अशा लोकांसाठी देखील शिफारस केली जाते.
याप्रसंगी बोलताना ड्युरोफ्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहनराज जे. म्हणाले,''जबाबदार ग्राहक ब्रॅण्ड म्हणून आमचा ग्राहकांना स्थिर जीवनशैलीप्रती पाठिंबा देण्याचा प्रयत्न आहे. आमच्या नॅच्युरल लिव्हिंग श्रेणीसह ग्राहकांना पर्यावरणास-अनुकूल व सुरक्षित स्लीप स्पेससाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळतील.
या श्रेणीअंतर्गत मॅट्रेसेस व स्लीप अॅक्सेसरीज जीओएलएस प्रमाणित लेटेक्स, रसायनमुक्त शुद्ध कापूस आणि बांबू-कापसाचे मिश्रण असलेल्या कापडापासून बनवण्यात आल्या आहेत, जे पर्यावरणास-अनुकूल असण्यासोबत व्यक्तीचे आरोग्य व स्वास्थ्याप्रती योगदान देतात. तथ्य असे आहे की, आम्ही देशामध्ये स्वत:चे लेटेक्स उत्पादन असलेल्या काही ब्रॅण्ड्सपैकी एक आहोत, ज्यामधून आम्ही ग्राहकांना देऊ इच्छिणारा दर्जा दिसून येतो.''
नॅच्युरल लिव्हिंग श्रेणीअंतर्गत मॅट्रेसेसमध्ये चार व्हेरिएण्ट्सचा समावेश आहे – तत्व, प्राण, काया व अवासा:
१. तत्व मॅट्रेसमध्ये दोन नैसर्गिक घटक लेटेक्स व कॉयरचा चांगुलपणा समाविष्ट आहे, ज्यामधून प्रबळ सपोर्ट मिळतो.
२. प्राण मॅट्रेस लेटेक्ससह पॉकेट स्प्रिंगपासून बनवण्यात आली आहे, जेथे सर्वोत्तम नैसर्गिक घटकांना स्प्रिंगच्या वैज्ञानिक सपोर्टची जोड देण्यात आली आहे.
३. काया हे १०० टक्के लेटेक्स मॅट्रेस, पूर्णत: नैसर्गिक व १०० टक्के बायोडिग्रेडेबल आहे.
४. अवासामध्ये आरामदायी प्रबळ सपोर्टसाठी लेटेक्स थर व रबरी कॉयर थराचे संयोजन आहे आणि किंमत किफायतशीर आहे.
नॅच्युरल लिव्हिंगअंतर्गत स्लीप अॅक्सेसरीजमध्ये मेहा मॅट्रेस टॉपर, निद्रा पिलोज आणि सर्वा नावांतर्गत दोन प्रकारच्या बेड लिनेन्सचा समावेश आहे, जे नैसर्गिक साहित्याच्या विभिन्न संयोजनांमधून बनवण्यात आले आहेत.
१. मेहा मॅट्रेस टॉपर अत्यंत आरामदायी झोप देते आणि २ इंच जाड १०० टक्के नॅच्युरल जीओएलएस प्रमाणित लेटेक्सपासून बनवण्यात आले आहे. ते तुमच्या विद्यमान कोणत्याही मॅट्रेसला आकर्षक, सहाय्यक जोड देऊ शकते, ज्यामधून नैसर्गिक वातावरणामध्ये झोपेसाठी संपूर्ण शरीराला आरोग्यदायी श्वास घेण्यायोग्य सपोर्ट मिळतो.
२. निद्रा पिलो सर्वोत्तम झोपेचा अनुभव देते, जी १०० टक्के नॅच्युरल लेटेक्ससह रसायनमुक्त आहे. प्रत्येक उशीमधील दोन जाडीच्या पर्यायांसह एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले कॉन्चर तुम्ही पाठ टेकवून, एका कुशीवर किंवा पोट टेकवून झोपत असला तरी मान व डोक्याला सर्वोत्तम आधार देते.
३. सर्वा कॉटन टेन्सेल बेडशीट स्वप्नवत झोपेचा अनुभव देते, जी कॉटनपेक्षा कोमल असण्यासोबत तिचा पृष्ठभाग नैसर्गिकरित्या थंडावा देतो आणि या बेडशीटमध्ये ओलावा शोषून घेण्याचा गुणधर्म आहे.
४. सर्वा कॉटन एथिकोट बेडशीट आरामदायीपणा देण्यासाठी पर्यावरणास अनुकूलरित्या सोर्स केलेल्या साहित्यापासून सर्वोत्तमरित्या तयार करण्यात आली आहे. प्री-कंझ्युमर रिसायकल कॉटनचा वापर १०० टक्के नैसर्गिक कापासाच्या चांगुलपणाबाबत तडजोड न करता ताज्या नैसर्गिक कापसावरील अवलंबता कमी करतो.
प्रत्येक उत्पादन व्यक्तीच्या गरजांनुसार विविध प्रकारचा आरामदायीपणा व सपोर्ट देते. ही सर्व उत्पादने ब्रॅण्डची वेबसाइट, प्रमुख ई-कॉमर्स व्यासपीठ, रिटेल आऊटलेट्स, तसेच कंपनीच्या एक्सक्लुसिव्ह एक्स्पेरिअन्स सेंटर्समध्ये उपलब्ध असतील. तुमच्या जवळ असलेल्या ड्युरोफ्लेक्स ब्रॅण्ड एक्स्पेरिअन्स सेंटर शोधण्यासाठी https://www.duroflexworld.com/a/store-locator/listयेथे भेट द्या.
0 Comments