आसनगाव आणि कसारा लोकलच्या फेऱ्या वाढवा गाड्या वेळेवर धावतील हेही सुनिश्चित करावे

मुंबई मध्य रेल्वे प्रशासनाकडे मनसेच्या दिनेश बेलकरे यांची मागणी


कल्याण आसनगाव आणि कसारा लोकलच्या फेऱ्या वाढवून  गाड्या वेळेवर धावतील हेही सुनिश्चित करावे अशी मागणी मनसेच्या दिनेश बेलकरे यांनी मुंबई मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.आसनगाव आणि कसारा ही मध्य रेल्वेची शेवटची स्थानके आहेत. त्यामुळे इतर स्थानकांच्या मानाने खूपच कमी लोकल गाड्यांच्या फेऱ्या ह्या स्थानकांत होतात.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदादरघाटकोपर आणि ठाणे यांसारख्या गजबजलेल्या स्थानकातून हजारो  प्रवासी सयंकाळी लोकलने घरच्या दिशेने परतीचा प्रवास करतात. आसनगाव आणि कसारा स्थानकातील प्रवाशांना एका बाजूने साधारणतः दिड ते अडीच तास लोकलचा प्रवास करावा लागतो.वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत ह्या स्थानकांसाठी आधीच लोकल च्या फेऱ्या  कमी असल्यानेलोकल मध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे कित्येक प्रवाशांना दिड ते दोन तासांचा हा प्रवास लोकल मध्ये उभे राहूनच करावा लागतो. गाडीच्या फेऱ्या कमी असल्यानेगाडी सुटली तर घरी पोहोचायला  तासभर उशीर होईल म्हणून जीव मुठीत धरून गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात अश्यातच आसनगाव व कसारा लोकलने प्रवास करणाऱ्या कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.ह्यात अजुन भर म्हणजे कसारा आणि आसनगाव स्थानकातून येणाऱ्या आणि ह्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या लोकल सर्रासपणे नेहमी उशीरा धावतात. प्रवासी संख्येच्या तुलनेत लोकल गाड्यांच्या खुपच कमी फेऱ्यागाडी मधील अफाट गर्दीसतत उभं राहून करावा लागणारा प्रवास आणि उशीरा धावणाऱ्या लोकल गाड्याह्यामुळे आसनगाव आणि कसारा च्या दिनेश प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. लवकरच ह्याचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत.     त्यामुळे वेळ न घालवतात्वरित आसनगाव आणि कसारा स्थानकांच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळी आणि संध्याकाळी लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात आणि गाड्या वेळेवर धावतील हेही सुनिश्चित करावे अशी मागणी मनसेच्या दिनेश बेलकरे ह्यांनी मुंबई मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments