पथनाटय सादर करुन बाल कामगार विरोधात जनजागृती


कल्याण :  बाल कामगार विरोध दिवस निमित्ताने चाईल्ड हेल्पलाइन व उरवी विक्रम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडुन जनजागृती अभियान राबविण्यात आले.रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या सहकार्याने या संस्थेने कल्याण पश्चिमेतील मुख्य रिक्षा स्टॅण्ड येथे पथनाटय सादर करुन व रिक्षानां बालकामगार विरोध संदेशपर स्टिकर लावुन जनजागृती केली.


याप्रसंगी विलास वैद्य,  जितु पवारसंतोष नवलेजगन्नाथ भागडे,  शगीर शेख,  हेमंत ठाणगेप्रताप सरोदेबापु चतुरव संस्थेच्या महिला पदाधिकारी लहान मुले उपस्थित होते. यावेळी समन्वयक अशोक यादव, समुपदेशक मनीषा कांबळे, टीम सदस्य शंकर कांबळे, दीपाली कांबळे, गणेश कांबळे, प्रतिभा पोळ, स्वयंसेविका सुवर्णा दाभोलकर आदिनिया हा उपक्रम राबविला.         

Post a Comment

0 Comments