वृत्तपत्रांच्या दणक्या नंतर एमआयडीसी रस्त्यावरील गाळ उचलला


कल्याण : एमआयडीसी सर्व्हिस रोड वरील नाल्यातील काढलेल्या गाळ हा रस्त्यावर टाकलेला होता. त्यामुळे त्यावरील वाहतूक बंद होती. शिवाय त्याची दुर्गंधी पसरली होती. याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर केडीएमसी प्रशासन जागे झाले.


शहर अभियंता सपना कोळी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन त्यांनी ठेकेदाराला चागलेच झापले. जर ताबडतोब कचरा उचलला नाही तर मोठा दंड लावण्यात येईल असे ठेकेदाराला सांगण्यात आले.


 ठेकेदारांनी त्वरित सदर रस्त्यावरील गाळ उचलून रस्त्याची साफसफाई करून दिली. याबद्दल येथील स्थानिक नागरिकांनी वृत्तपत्रांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments