केडीएमसीचे रुक्मिणीबाई रुग्णालय व्हेंटिलेटरवर रुक्मिणी बाई रुग्णालयाला उप जिल्हा मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नोवेल साळवे यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र

 


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय जणूकाही व्हेंटिलेटवर असून आरोग्य सुविधाबाबत वर्षानुवर्षे वंचित  असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरिकांना आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करण्यास साठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीतील असलेल्या रुक्मिणी बाई रुग्णालयाला उप जिल्हा मध्यवर्ती शासकीय रुग्णालय म्हणून मान्यता कॅबिनेट मध्ये पारित करून घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  महाराष्ट्र प्रदेशचे माजी सचिव व प्रदेश प्रतिनिधी नोवेल साळवे यांनी केली आहे.

          


महाराष्ट्रात सर्वात जास्त कर आकारणारी महापालिका म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेची ख्याती आहे. परंतु ही महापालिका नागरिक सुविधा पुरविण्यात कायम अपयश ठरलेली दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांवर येथील बहुतेक सर्वच नेते मौन धारण करून आहेत.  त्यात अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे तो आरोग्य सुविधांचा. येथील काही मोठे नेत्यांचे खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी साटेलोटे असल्याकारणाने ते सरकारी दवाखान्याकडे दुर्लक्ष करत असतात.


कल्याण डोंबिवली महापालिका च्या अखत्यारीत प्रमुख दोन रुग्णालय आहेत. एक कल्याण मधील रुक्मिणी बाई रुग्णालय व दुसरे डोंबिवली येथे शास्त्रीनगर रुग्णालय असे दोन प्रमुख रुग्णालये कार्यरत आहेत. सन १९९५ च्या आधी अनेक प्रकारच्या सुविधा या दवाखान्यात पुरविल्या  जायच्याकल्याण येथे रुक्मिणी बाई रुग्णालयाची जुनी इमारत तोडून  बाजूलाच प्रशस्त १३५ खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत या रूक्मिणी बाई रुग्णालयाच्या हळूहळू सुविधा कमी होत गेल्या. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील नागरीक अपुऱ्या सुविधा मुळे त्रस्त झाले आहेत.


कोणत्याही आजाराचे रुग्ण  या रुग्णालयात आले तर त्यांचे प्राथमिक इलाज सुद्धा होत नाही. त्या रुग्णाला पुढे  कळवा किंवा मुंबईला पाठविले जाते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेली कल्याण डोंबिवली महापालिका स्वताच्या कार्यक्षमतेवर विश्वास नसल्यानेकाही वर्षापूर्वी कल्याण महापालिकेने ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मार्फत राज्य सरकारला रुक्मिणी बाई रुग्णालय शासनाने आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून विनंती केली होती. त्याबद्दलची काही तरतूद खालच्या स्तरावर  पुर्ण केली गेली आणि  २०२०/ २०२१साली राज्य शासन दरबारी त्यावरील सुनावणी ही घेण्यात आले होती. या विषयावरून संपूर्ण तालुक्यातील जनतेला असे वाटते की राज्य सरकारने रुक्मिणी बाई रुग्णालय आपल्या ताब्यात घेऊन त्याला उप जिल्हा मध्यवर्ती शासकीय रुग्णालय घोषित करेल.


 

महापालिका रुग्णालयात उपचारा अभावी  सामान्य जनतेवर होत असलेला अन्याय दूर करण्यास साठी रुक्मिणी बाई रुग्णालयाला उप जिल्हा मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचा दर्जा द्यावाजेणेकरून सामान्य मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला आरोग्य सुविधांचा मोफत लाभ घेता येईल. आजच्या घडीला महाराष्ट्रातील सामान्य मध्यमवर्गीय जनतेला दोनच गोष्टी बरबाद करतात एक आरोग्य सेवा आणि दुसरे शिक्षण सेवा. या साठी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विषेश बाब म्हणून राज्याच्या कॅबिनेट मध्ये कल्याण येथे उप जिल्हा मध्यवर्ती शासकीय रुग्णालय मंजूर करून घ्यावे अशी मागणी नोवेल साळवे यांनी केली आहे.जर एक महिन्याच्या आत हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर नाईलाजाने जनहितार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments