मुंबईचे अभिनव राज हे मेक्सिकोतील भारतीय संस्कृती केंद्राचे प्रमुख


मुंबई : जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन व्यावसायिक पारंगत  असणारे व भारतीय संस्कृतीचे सखोल ज्ञान असलेले रंगकर्मी अभिनव राज यांची गुरुदेव टागोर इंडियन कल्चर सेंटर (GTICC)मेक्सिकोचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


   शाश्वत व्यवहार मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार संचालक (प्रशासक) यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रानुसार श्री राज यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी राजनैतिक दर्जाची आहे.  

 

     श्री. राज पूर्वी यांनी बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड ( गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइझ ) मुंबई मध्ये जवळपास एक दशक काम केले आहे.  बाल्मर लॉरी हे 155 वर्षांची सरकारची जुनी एंटरप्राइझ आहे. ज्याची अनेक सेवा आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये अतिशय वैविध्यपूर्ण कामगिरी केली आहे. 

     

      त्यांच्या रंगभूमीवरील कार्य काळात ते बिहार आणि पश्चिम बंगालमधील अनेक नाट्यसमूहांचे सक्रिय सदस्य होते.  ते रंगकर्मी (संगीत नाटक अकादमी अंतर्गत) सिनेमाचे विद्यार्थी आणि बिहार  सरकारने आयोजित केलेल्या चित्रपट कार्यशाळेचे सक्रिय सदस्य होते. 

     

       आपल्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना श्री. अभिनव राज यांनी लवकरच आपली जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगितले. मराठी पाककला आणि लोककला हा जिव्हाळ्याचा विषय असून जागतिक व्यासपीठावर  या कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले.

Post a Comment

0 Comments