डोंबिवली ( शंकर जाधव ) आमच्या वेळी सहज उपलब्ध व्हावे असे साधन नव्हते. आता सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल आले आहेत.या डिजिटल काळात स्पर्धा खूप वाढली आहे.म्हणूनच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन त्यांना करीयरच्या वाटा दाखवणे आवश्यक आहे असे शिवसेनेचे उपशहरप्रमुख संतोष चव्हाण यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
शालांत परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवसेनेच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथील अनमोल नगरी येथील जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.यावेळी उपशहरप्रमुख संतोष चव्हाण शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे, अॅड गणेश पाटील, संदीप सामंत, मनोज वैद्य, अनमोल म्हात्रे, श्रीकांत बिरमुळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी उपशहर प्रमुख चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तर बाळा म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना कसलीही मदत लागल्यास शिवसेनेच्या शाखेत यावे असे सांगितले.
0 Comments