राष्ट्रीय पाँवरलिफ्टींग कल्याणच्या नेत्रा फडकेला सुवर्ण पदक


कल्याण : वल्ड पाँवर लिफ्टींग इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या नँशनल राँ पाँवर लिफ्टींग स्पर्धा नुकतीच हावरा कलकत्ता येथे पार पडली. या राष्ट्रीय पाँवर लिफ्टींग स्पर्धेत  कल्याण मधील नमस्कार मंडळ ची खेळाडू नेत्रा प्रसाद फडके हीने सबज्युनिअर 84 किलो वजनी गटात  सुवर्ण पदक पटकवून डेडलिफ्ट व स्कॉट या दोन्ही प्रकारात यशस्वी वजन उचलून राष्ट्रीय रेकॉर्ड करून सुवर्ण पदक पटकावले व सब ज्युनिअर गटात बेस्ट लिफ्टर आँफ इंडीयाची ट्राँफी पटकावली.


नेत्राने पॉवरलिफ्टिंग या खेळांमध्ये या अगोदरही अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या असून पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धे मध्ये कल्याण चे नाव उज्वल करायचे स्वप्न नेत्रा पाहत आहे. नेत्रा ला या कामगिरी साठी त्याचे नमस्कार मंडळाचे प्रशिक्षक श्रीबास गोस्वामी  व छत्रपती पुरस्कार विजेत्या पल्लवी गोस्वामी व अशोक दिक्षित  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 


नेत्रा सह त्याच्या टिम मधील नमस्कार मंडळाचे  खेळाडू अथर्व दुर्गोळी, निनाद जाधव ,ज्ञानेश्वर पथारकर, अजयकुमार निगम, यश खुटवाड, शुभम चौधरी, वैष्णवी पाटील , रेखा काकडे , अशोक दिक्षित, व पल्लवी गोस्वामी यांनी विविध पदके मिळवली. तसेच वरद  करमरकर या खेळाडू ने सुवर्ण पदकांसह पुरुष ज्युनिअर गटात बेस्ट लिफ्टर आँफ इंडिया चा किताब पटकला. या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments