ब्लूसेमीने पॅरीस मध्ये आयोजित विवाटेक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले


जगातील पहिले नॉन-इन्व्हेझिव्ह उपकरण 'ईवायव्हीए' केले प्रदर्शित ~


मुंबई, २० जून २०२२: आपल्या प्रमुख सेवांद्वारे लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यास कटिबद्ध असलेली भारतातील अग्रगण्य हेल्थटेक कंपनी ब्लूसेमी (BlueSemi) आणखी एका सन्मानाची मानकरी ठरली आहे. संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावणा-या एका नव्या घडामोडीनुसार हेल्थटेक क्षेत्रातील या प्रवर्तक कंपनीने विवाटेक या नवसंकल्पना, स्टार्टअप आणि तंत्रज्ञानाच्या युरोपमध्ये भरविण्यात आलेल्या सर्वात मोठ्या सोहळ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.


या सोहळ्यामध्ये ईवायव्हीए हे आपले प्रमुख उत्पादन प्रदर्शनार्थ मांडण्याचा सन्मान ब्लूसेमीला मिळाला. ईवायव्हीए हे केवळ एका स्पर्शाने ६० सेकंदांहूनही कमी वेळेत रक्तातील ग्लुकोजची पातळी, ईसीजी, हृदयाचे ठोके, रक्तदाब, एसपीओ२, एचबीए१सी यांच्यासह शरीरातील ६ प्रमुख घटकांचे मापन करणारे जगातील पहिले नॉन-इन्व्हेझिव्ह उपकरण असून युरोपीय बाजारपेठेतील खास पदार्पणाचा एक भाग म्हणून या सोहळ्यातील भारतीय दालनामध्ये हे उपकरण मांडले गेले.


भारतासाठी तर हा प्रसंग अधिकच खास आहे कारण यावर्षी प्रथमच या देशाला 'कंट्री ऑफ द इअर' हा सन्मान देण्यात आला आहे. म्हणूनच या कार्यक्रमामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट नवसंकल्पना मांडण्याची संधी मिळणे आणि त्यानिमित्ताने उदयोन्मुख भारतीय स्टार्ट-अप समुदायाला वैश्विक अनुभव देणारा एक अस्सल मंच उपलब्ध होणे ही अत्यंत अभिमानाची आणि सर्वाधिक महत्त्वाची बाब होती.


ब्लूसेमीचे संस्थापक आणि सीईओ सुनील मड्डीकत्ला म्हणाले, “भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी खरोखरीच सन्मानाची गोष्ट आहे. विवाटेकच्या भारतीय दालनामध्ये आपली प्रमुख उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी भारत सरकारने निवडलेल्या काही मोजक्या कंपन्यांमध्ये निवड होणे ही आमच्यासाठी प्रचंड सुखद आणि उत्साहपूर्ण बाब होती.


आमच्यासाठी हा प्रसंग अत्यंत सुयोग्य होता, कारण या प्रदर्शनाच्या निमित्ताने आमचे प्रमुख उत्पादन ईवायव्हीएने प्रदर्शनाला येणा-या पाहुण्यांच्या साक्षीने प्रथमच युरोपीय बाजारपेठेत पदार्पण केले. प्रदर्शनातील आमच्या या पदार्पणाला जगभरातील प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, याची आम्हाला खात्री होती.”


या सोहळ्यामध्ये जगभरातील देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्टार्ट-अप्सचे प्रदर्शन, नवसंकल्पनांचे प्रदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्रे, सीईओंची व्याख्याने इत्यादी गोष्टींचा समावेश होता व या कार्यक्रमाला उपस्थित राहणा-या १४९ देशांतील सहभागींना जगभरातील अग्रगण्य वक्त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळाली.

Post a Comment

0 Comments