वसुंधरा अभियान २.० अंतर्गत विभाग स्तरा वरील उत्कृष्ट कामगिरी बद्दल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान


ठाणे, दि. ५ (जिमाका): वसुंधरा अभियान २.० अंतर्गत विभागस्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा आज मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


वसुंधरा अभियान २.० अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या नगरपालिका, अमृत शहरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आदी संस्था आणि अधिकाऱ्यांना पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत झालेल्या आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. 


यावेळी ठाणे जिल्ह्याने कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली असून त्याबद्दल या कार्यक्रमात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सन्मान करण्यात आला. 


यावेळी विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन या अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला. एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर, सकाळ चे संपादक सम्राट फडणीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments