ठाण्यात जेष्ठ नागरिकांना काँग्रेस कडून मोफत छत्री वाटप


ठाणे, प्रतिनिधी :  ठाणे शहर(जिल्हा)काॅग्रेस कमिटीच्या वतीनं शहर काॅग्रेस सरचिटणीस सचिन शिदे यांच्या वतीने काॅग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय दिलीपभाई नाखवा यांच्या स्मरणार्थ रविवारी चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व येथील नवयुग मित्र मडळाच्या कार्यालयात जेष्ठ नागरिकांना जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र व मोफत छत्री वाटप करण्यात आला आले.


              या कार्यक्रमात ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,ठाणे महानगर पालिका माजी उपमहापौर पल्लवी कदम,स्वर्गीय दिलीप नाखवा याचे कुटुंबिय प्रफुल्ल नाखवा,चंद्रकांत नाखवा,राम भोसले, भालचंद्र महाडिक,निशिकांत कोळी,महेंद्र म्हात्रे,निलेश शेंडकर,निलेश अहिरे,गिरीश कोळी,रमेश इंदिसे सुभाष ठोम्बरे,शिरीष घरत,शिवाजी पिंगळे,बाळा घरत,योगेश मयेकर,राखी प्रविण खैरालिया,नवनीत सिनलकर,माधुरी कोळी,अलका सिनलकर,गायकवाडताई आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन काॅग्रेस सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी यांनी केले होते.


            या कार्यक्रमात चेदणी कोळीवाडा व ठाणे पूर्व परिसरातील जेष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात छत्र्यांचे वितरण व जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र देण्यात आले.

Post a Comment

0 Comments