देश भरातील हिंसाचाराच्या विरोधात बजरंग दलाचे कल्याणमध्ये आंदोलन


कल्याण :  देश भरात हिंदूंवर होत असणारे भ्याड हल्ले, दगडफेक, जाळपोळ व हिंसाचाराच्या विरोधात कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथे बजरंग दलतर्फे आंदोलन करण्यात आले.


 

देश भरात होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात बजरंग दल ने भारतभर धरणे आंदोलन करण्याची हाक दिली होती. बजरंग दल कल्याण जिल्हाच्या वतीने कल्याण पूर्वचक्की नाका येथे शांततेने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बजरंग दलाचे ४० ते ५० कार्यकर्ते सहभागी झाले होते.कार्यक्रमात वक्ता म्हणून जिल्हा मंत्री अभिषेक गोडबोले यांनी विषय मांडला. यावेळी वि.हिं.प.च्या जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुधा जोशी, धर्म प्रसार प्रमुख ॲड. रोशन जगतापबजरंग दल संयोजक करण  उल्लींगल  देखील उपस्थित होते. धरणे आंदोलन केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले. 

Post a Comment

0 Comments