भिवंडी शहरात गरिबांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा मिळेल याकडे लक्ष देणे हेच मुख्य ध्येय -- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील


भिवंडी दि 2(प्रतिनिधी ) केंद्र सरकार विविध ठिकाणी वैद्यकीय सोयी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे, आयुष्यमान भारत प्रत्येक जिल्ह्यात चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य शासन देखील वेगवेगळ्या योजनांमधून आरोग्य सेवा देत आहे. पालिका आरोग्य केंद्रात देखील चांगल्या प्रकारे औषध उपचार होणे आवश्यक आहे. 


आपल्याकडे जो रुग्ण येणार आहे त्याला चांगल्या प्रकारे योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे यासाठी पालिकेने प्रयत्न करीत आहे हे स्तुत्य आहे असे उद्गार केंद्रीय पंचायत राज्य मंत्री  कपिल पाटील यांनी काढले. महानगरपालिकेच्या  पदमानगर येथील आरोग्य केंद्राचे लोकार्पण केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी कपिल पाटील बोलत होते.


यावेळी व्यापीठावर महापौर प्रतिभा विलास पाटील, आमदार महेश चौगुले, आयुक्त विजयकुमार म्हसाळ, सभागृह नेते सुमित पाटील, भाजपा गटनेते हनुमान चौधरी, नगरसेवक संतोष शेट्टी, यशवंत टावरे,नित्यानंद नाडर, साक्राबाई बगाडे, पदमा कल्याडपू, दिलीप कोठारी, क्षमा ठाकूर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त दीपक झिंजाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, मुख्य वैद्यिकीय अधिकारी बुषारा सय्यद  यांसह मोठ्या संख्येने मान्यवर नागरीक पालिका कर्मचारी उपस्थित होते.


कपिल पाटील पुढे म्हणाले की, माणसाला रुग्णालयाची गरज नाही लागली पाहिजे अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे .देशातील नागरी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी 42 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे .पालिकेने दहा हेल्थ वेलनेस सेंटर मागणी केली आहे ती लवकरच पूर्ण करीत आरोग्याच्या बाबतीत अधिक भरीव काम करण्याची गरज असून ,त्यावर सर्वांनी राजकारण बाजुला ठेवून सर्व मिळून आरोग्याची चिंता केली तर शहराचा आरोग्य सुदृढ होऊ शकते असे प्रतिपादन कपिल पाटील यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी केले तर महापौर प्रतिभा पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य  जपले तर समाजस्वस्थ सुदृढ होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमा दरम्यान या नागरी आरोग्य केंद्र उभारणीसाठी सभागृह नेते सुमित पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. उपआयुक्त दीपक झिंजाड यांनी उपस्थित मान्यवरांचे सर्व आभार  मानले.

Post a Comment

0 Comments