स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचा स्थायी समिती मध्ये सत्कार


भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी महापालिकेचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत लक्षात घेऊन शेवटची स्थायी समितीचे कामकाज असल्याने स्थायी समितीमध्ये संजय म्हात्रे व आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचा सत्कार  प्रभाग समिती 2 चे  सभापती प्रशांत लाड यांनी केला. यावेळी प्रशांत लाड म्हणाले की, संजय म्हात्रे यांच्या स्थायी समिती सभापती कालावधी मध्ये अनेक विकास कामे मार्गी लागला,ही बाब प्रशांत लाड यांनी खास नमूद केले.


पालिका नवनियुक्त  आयुक्त हे स्थायी समितीमध्ये  प्रथमच आल्याने त्यांचा देखील सत्कार सभापती संजय म्हात्रे करण्यात आला, पालिकेची  विकास कामे कधीही थांबत नाहीत हे पण नगरसेवक आपल्या प्रभागातील नागरी समस्या मांडत असतात ते आपल्या कामाविषयी आग्रही असतात. त्यामुळे स्थायी समिती मध्ये विकास कामांच्या बाबतीत आम्ही आग्रही असतो त्याला प्रशासनाने चांगली साथ दिली असे उद्गार प्रभाग समिती 2 चे सभापती प्रशांत लाड यांनी काढले .


 यावेळी सभागृहात स्थायी समिती सदस्य विलास आर.पाटील, श्याम अगरवाल, हलीम अन्सारी, डॉ.जुबेर, अरुण राऊत, वसीम अन्सारी  इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments