खेलो इंडिया मध्ये डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे सुयश

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील  भोईर जिमखान्याने  खेलो इंडिया अकादमीने ४ ते ६ जून  या कालावधीत हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये २ रौप्य पदके आणि ४ कांस्य पदके जिंकली.


सानिका अत्तर्डे – (Uneven Bars) कांस्यपदक,अथर्व टेमकर – (Floor Exercise.) कांस्यपदक,मेघ रॉय – (Floor Exercise.) रौप्य पदक, मनेश गाढवे – (Floor Exercise. ) रौप्य पदक,मनेश गाढवे –(Horizontal Bar)  कांस्यपदक, मनेश गाढवे – (All around championship.)ऑल अराउंड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकाविले.


सर्व विजेत्या खेळाडूंना  लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली.तसेच विजेत्या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाकडून  सत्कार  केला जाणार आहे.सर्व विजेत्यांचे  मुकुंद भोईर, रमेश पाटील आणि त्यांचे प्रशिक्ष नंदकिशोर तावडे आणि रविंदर शिर्के यांनी कौतुक केले.भोईर जिमखाना परिवाराला अभिमान वाटतो आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो असे पवन भोईर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments