त्या तरुणीची आत्महत्या नव्हे तर हत्या – चित्रा वाघ

  

हत्येच्या दिशेने तपास करण्याची भाजप नेत्या  चित्रा वाघ यांची मागणी कल्याण मध्ये पोलिसांची घेतली भेट


 

कल्याण : कल्याण मधील त्या तरुणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असून हत्येच्या दिशेने पोलिसांनी तपास करण्याची मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. कल्याणमधील एका अल्पवयीन तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते.        यामुळे तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारून आत्महत्या केली.  पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांची भेट भाजप नेत्या वाघ यांनी आज सायंकाळी घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक बसीर शेख यांची भेट घेतली.यावेळी चित्रा वाघ यांनी सांगितले कीपिडीत तरुणीवर चार वर्षापासून लैगिंक अत्याचार केला जात होता. या प्रकरणात सात तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. त्यापैकी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. दुस:या तरुणीचा शोध सुरु आहे. आत्महत्या झाली तेव्हा एका मुलीसह अन्य आरोपी तिच्या सोबतच होते.त्यामुळे तिच्या कुटुंबियानी माहिती दिली आहे कीमुलीने आत्महत्या केली नसून तिला ढकलून देऊन मारण्यात आले आहे. पोलिसांनी केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. इस्टाग्रामवरील अॅपवर पिडीत तरुणीला व्हीडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे आयटी कायद्याचे कलम आणि बलात्काराचे कलम लावले गेले पाहिजे. पोलिसांनी ते लावलेले नाही. शक्ती कायद्यानुसार काही कलमे लावली गेलेली नाही. ही कलमे लावून पिडीत तरुणीच्या कुटुंंबीयांना न्याय द्यावा. या प्रकरणात बडय़ा घरच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तिच्या आई वडिलांवर दबाव टाकला जात आहे.पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे. तसेच मुलीच्या मामाला तपासाची माहिती वेळोवेळी द्यावी. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना एफआरआयची कॉपी दिली नव्हती. तिचे कुंटुंबिय जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. आठ दिवसांनी तिच्या आई वडिलांचा सविस्तर जबाब घेतल्यास त्यातून आणखीन वेगळी परिस्थिती बाहेर येऊ शकते. संबंधित आारोपींनी अन्य कोणासोबत हाच प्रकार केला आहे का हे देखील उघड होऊ शकतो असे वाघ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments