कल्याण पूर्वेतील आनंदवाडी पोलीस चौकी अनेक दिवसां पासून बंद


कल्याण : कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गतआनंदवाडी डबल टॉवर जवळ असलेली पोलीस चौकी अनेक दिवसांपासून बंद आहे. या बंद पोलीस चौकीमुळे परिसरातील लोकांमधे असुरक्षितता भावना निर्माण झाली आहे. येथून येणारे जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी विशेषतः महिला वर्ग ज्यांना याच परिसरातून रात्री ये जा करावी लागते त्यांना या बंद पोलीस चौकीमुळे असुरक्षित वाटत असून ही बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.याबाबत कल्याण विकासिनीचे अध्यक्ष ऍड. उदय रसाळ यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना पत्र लिहित या विषयाकडे लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments