राहनाळ जिल्हा परिषद शाळा येथे शाळा प्रवेश उत्सव जल्लोषात साजरा


कल्याण : शाळेचा पहिला दिवस आजही मला आठवत आहे. तुमच्यासारखाच मी शाळेत पहिल्या दिवशी जायचो तो आनंद आज मला पुन्हा राहनाळ शाळेतील कार्यक्रमास उपस्थित राहून घेता आला असे उद्गार राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी राहनाळ येथील इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या स्वागत उत्सव समारंभात काढले.


जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे पहिलीच्या मुलांचा स्वागत उत्सव व मुलांना मोफत पाठ्यपुस्तकेमोफत गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवीगटशिक्षणाधिकारी संजय अस्वलेवरिष्ठ विस्तार अधिकारी प्रकाश मते,  ग्रामविकास अधिकारी अनिल पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडूआगरी सेना महिला तालुका प्रमुख मनिषा माळीपालक वर्गमोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच दिवशी मुलांना मोफत गणवेशमोफत पाठ्यपुस्तके चॉकलेट वाटप करण्यात आले.


शाळा प्रवेश मेळावा भाग २ साठी स्टॉल लावण्यात आले होते. संध्या जगतापरसिका पाटीलअनघा दळवीगायत्री सोनटक्केअमृता पवारआशा वाघ यांनी मुलांचे स्टॉलवर स्वागत करुन मुलांकडून प्राथमिक क्रिया करुन घेतल्या. अत्यंत उत्साहात मुलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन चित्रा पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments