टिटवाळा महागणपती मंदिराला अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी "महादर्शन उपक्रमा"अंतर्गत दिली भेट


कल्याण : राज्य पर्यटन विकास महामंडळच्या सहकार्याने रविवार पासून 'महादर्शन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाची सुरूवात रविवारी मुंबईच्या सिध्दीविनायक मंदिरापासून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या उपक्रमातील महादर्शन बसला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. मुंबई सिद्धिविनायक, अंबरनाथ येथील शिवमंदिराला भेट दिल्यानंतर प्रसिद्ध अभिनते मिलिंद गुणाजी यांनी टिटवाळा ऐतिहासिक महागणपती मंदिराला भेट दिली.


या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील प्राचीन मंदिरांचा इतिहाससंस्कृती, परंपरा याची माहिती संपूर्ण देशात, परदेशात पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी ऑडिओव्हिडिओच्या माध्यमातून कलाकार मंदिरांचीपर्यटन स्थळांची चित्रफीत बनवली जाणार आहे.  या उपक्रमाच्या माध्यमातून ही बस राज्यातील प्रत्येक प्राचीन आणि जुन्या मंदिरांना,पर्यटन स्थळांना  भेट देणार असून रविवारी उपक्रमाला सुरवात केली. मुंबई सिद्धिविनायक, अंबरनाथचे शिवमंदिर त्यानंतरचा टिटवाळा गणपती मंदिराना भेटी दिल्या आहेत.


   या उपक्रमांतर्गत निरनिराळ्या ऐतिहासिक धार्मिक स्थळ लोकांना घरबसल्या पाहता येतील असं अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी यानिमित्ताने सांगितले. तसेच टिटवाळ्यातील पाणी टंचाई ग्रस्तांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून फार्दस् डे चे औचित्य साधत कै.मारूती देशेकर यांच्या प्रथम पुण्य स्मारणार्थ विजय देशेकर यांनी सुरू केलेल्या मोफत पिण्याच्या पाण्याचा टँकर सेवेचा शुभारंभ अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते करण्यात आला.

Post a Comment

0 Comments