वेल्ला प्रोफेशनल्सचा लूक अँड लर्न क्रोमॅटिक सेमिनार मुंबईमध्ये संपन्न

वेल्ला प्रोफेशनल्स घेऊन आले आहे क्रोमॅटिक – एक नवीन कलर करेक्शन जे साजरा करते विविधता आणि आत्माविष्काराचा उत्सव


मुंबई, 06 June, 2022: असे म्हणतात की, आपले केस म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची अभिव्यक्ती असते आणि हेअरस्टाइलिस्ट व ग्राहकांना अशाप्रकारे स्वत:ला व्यक्त करण्याचा मार्ग शोधण्यास मदत करण्यासाठी रूढ चौकटींच्या पार जाण्याचा प्रयत्न वेल्ला प्रोफेशनल्सकडून सातत्याने होत असतो.


क्रोमॅटिकच्या माध्यमातूनही वेल्ला हेअरस्टाइलिस्ट्सना त्यांच्या सर्जनशीलतेचा विमुक्त अविष्कार करण्याची मोकळीक देत आहे व ग्राहकांना दर दिवशी आपला सर्वोत्तम लुक झळकवण्यास मदत करत आहे. या ब्रँडने मुंबईत आयोजित केलेल्या लुक अँड लर्न सेमिनारच्या माध्यमातून हेअर कलर एक विविधांगी कलेक्शन बाजारात दाखल केले आहे. या सेमिनारमध्ये एल्टन स्टीव्ह, हेअर स्पेश्यालिस्ट आणि एज्युकेटर आणि प्लासिड ब्रगान्झा, प्लासिड सॅलॉनचा मालक यांनी हेअर कलर च्या आणि स्टायलिंगच्या विविध पद्धतींचे मर्म उलगडून दाखवले.


वेल्ला क्रोमॅटिक हे नवीन कलर कलेक्शनमध्ये नेहा धुपिया, अपारशक्ती खुराना, कृष्णा मुखर्जी आणि साक्षी अगरवाल अशा चार सेलिब्रिटीजसाठी वेल्ला पॅशनिस्टा – एल्टन स्टीव्ह, निखिल शर्मा, प्लासिड ब्रगान्झा आणि रोहन पटेल या चार वेल्ला पॅशनिस्टांनी तयार केलेले खास लुक्स प्रदर्शनार्थ मांडण्यात आले आहेत.


हे लुक्स हेअरस्टाइलिस्ट्सच्या कलात्मक स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतात आणि त्यांना स्वत:चे कलर कॉकटेल आणि तंत्र निर्माण करण्याची प्रेरणा देतात. त्याचवेळी हे रंग ग्राहकांनाही स्वत:च्या अंतर्मनातील भावनांचा शोध घेण्याची प्रेरणा देतात. हा शोध त्यांच्या अंगीचे अनेक जगावेगळे गुण, कसब, कल्पना आणि जगाबद्दलचा दृष्टीकोन यांच्याशी मेळ साधणारा आहे. केस रंगविण्यासाठी कोणत्याही खास प्रसंगाची वाट पाहण्याची गरज नाही असा संदेशही हे रंग देतात.


या सेमिनारमध्ये वेल्ला पॅशनिस्तांनी स्टेजवर प्रत्यक्षात हे सेलेब्रिटी लुक्स उलगडून दाखविले आणि प्रेक्षकांतील हेअरस्टाइलिस्ट्सना ‘स्वत:चे सिग्नेचर लुक्स’ तयार करता यावेत यासाठी काही टिप्स आणि क्लुप्ती सांगितल्या.


प्लासिड सॅलॉनचा मालक प्लासिड ब्रगान्झा म्हणाला, “वेल्ला प्रोफेशनल्सच्या उपक्रमाचा भाग बनणे ही माझ्यासाठी नेहमीच मानाची गोष्ट राहिली आहे आणि क्रोमॅटिक कलेक्शनमुळे मला एक हेअरड्रेसर म्हणून स्वत:ला सर्जनशीलरित्या व्यक्त करता आले.  एक लुक तयार करण्याच्या या प्रक्रियेत मी हेअरड्रेसर म्हणून स्वत:ला नव्याने सापडलो आणि मला वाटते की हा लुक कुणीही सहज तयार करू शकते.


कृष्णा मुखर्जीसाठी लुक निवडताना मी तिच्या उत्साहाने सळसळत्या व्यक्तिमत्त्वाशी मिळतीजुळती केशरचना करण्याचा प्रयत्न केला आणि  केशसंभारामध्ये रंगांचा सुरेख खेळ मांडणा-या रस्टिक कॉपर छटांबरोबर काही प्रयोग करत तिच्या तेजस्वी त्वचेला साजेशी केशरचना केली. केसांची अर्धवर्तुळाकार विभागणी करून कॉपरच्या छटा असलेल्या फॉइल्सची गुंफण करत तिला एक ताजाटवटवीत लुक दिला. या लुकने तिच्या केसांचे सौंदर्य अधिकच खुलवले व तिच्या प्रकृतीशी हा लुक पूर्णपणे जुळला. “

Post a Comment

0 Comments