अक्षय प्रजापती “स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र”चा मानकरी


कल्याण महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर व ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय प्रजापती हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्पर्धकाला देण्यात येणारा  “स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र” हा मानाचा किताबाचा मानकरी ठरल्याने  महाविद्यालयाचं नाव उज्वल केलं.


या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. अक्षय याने ६६ किलो ज्युनिअर गटात सहभागी होत स्कॉट या प्रकारात २६२.५ किलोबेंचप्रेस या प्रकारात १६० किलो व डेडलिफ्ट या प्रकारात २३७.५ किलो असे एकूण ६६० किलो वजन उचलून सुवर्ण पदकासह स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र” हा किताब पटकावला. त्याच्या या यशाबद्दल शाहू शिक्षण संस्था कल्याणचे सचिव डॉ.गिरिश लटकेडायरेक्टर एस.एस.शिवशरणमहाविद्यालयाच्या प्राचार्या कोमल चंदनशिवेक्रीडा विभाग प्रमुख प्रा.नवनाथ गायकरसर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments