राजकारणात डावपेच असतात ते शिकून येणं गरजेचं – दिपाली सय्यद

आताच राजकरण सूडबुद्धीच राजकारण आहे त्यापासून आपण सांभाळून चाललं पाहिजे शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद यांचा मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सल्ला 

 

कल्याण : राजकारणात डावपेच असतात ते शिकून येणं गरजेचं असून आताच राजकरण  सूडबुद्धीच राजकारण आहे त्यापासून आपण सांभाळून चाललं पाहिजे असा खोचक सल्ला शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.          दिपाली सय्यद कल्याण पूर्वेत  खडेगोळवली येथे माजी महापौर रमेश जाधव यांच्या कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या त्यावेळी त्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना हा सल्ला दिला आहे. यावेळी प्रभागातील जेष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना विनामुल्य छत्र्यांचे वाटप करण्यात आले तसेच १० दिव्यांगांना तिनचाकी सायकली भेट स्वरूपात देण्यात आल्या. आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य चिकित्सा शिबीराचा  परिसरातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. भाजप शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेत मतपत्रिका इतरांना दाखवल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडसुहास कांदे, यशोमती ठाकुर यांची मतं बाद करण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना प्रवक्ता दिपाली सय्यद यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना खोचक सल्ला दिला. दिपाली सय्यद यांनी बोलताना जे काही होणार आहे ते कायद्याप्रमाणे होणार आहे मात्र मी आव्हाड साहेबांना इतकंच सांगेल की राजकारणात डावपेच असतात ते शिकून येणं गरजेचं आहे.नक्की काय खरं आहे काय खोट आहे हे त्यानांच ठाऊक, पण जर अशा पद्धतीने काही झालं असेल तर आव्हाड साहेबांनी सांभाळून चाललं पाहिजेकाही नियम असतात त्याच्यामुळे आपल्याला काही परिणाम होवू नयेकारण आता जे राजकारण आहे ते सूडबुद्धीच राजकारण आहे सुडाचं राजकरण आहे त्यापासून आपण सांभाळून चाललं पाहिजे असा सल्ला दिपाली सय्यद यांनी दिला.

 

Post a Comment

0 Comments