आकाश टोगरे आणि सुफियांन शेख यांना खेलो इंडिया युवा खो खो स्पर्धेत सुवर्ण


कल्याण :  महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा खो-खो स्पर्धेत मुले आणि मुली या दोन्ही गटात सुवर्ण पदकांची कमाई करत दुहेरी मुकुट पटकावला. मुलांमध्ये अंतिम सामन्यात ओडीसा चे कडवे आव्हान महाराष्ट्राला होते पण महाराष्ट्राच्या मुलांनी ते सहज परतावले.  महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खणखणीत खेळ करत सुवर्ण पदकांची च कमाई केली.


यामध्ये एस एस टी महाविद्यालयातील आकाश टोगरे आणि सुफियान शेख यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच उत्तम  खेळाचे प्रदर्शन केले आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राला सुवर्ण पदकापर्यंत  नेण्यासाठी उत्तम साथ दिली. 


महाराष्ट्र जेतेपदाच्या अगदी जवळ यात  होता,  पण हरियाणाच्या खेळाडूंनी उत्तम खेळ करत विजेतेपद पटकावले, यात महाराष्ट्राला  द्वितीय जेतेपदावर समाधान मानावे लागले.


 एस एस टी महाविद्यालयचे संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, उपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवार, महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्रताप शेलार आणि नरेंद्र मेंगल यांनी सुद्धा खेळाडुंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments