पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मनसैनिकाचे आमरण उपोषण

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत १ जून २०१५ रोजी २७ गावे समाविष्ट झाली. २७ गावांचा मुख्य प्रश्न 'पाणी' सुटेल असा विश्वास येथील गावकऱ्यांना झाला होता.मात्र एमआयडीसीने ५०० कोटी पाणी बिल थकबाकी असल्याचे जाहीर केल्यावर पाणी प्रश्न का सुटत नाही याचे उत्तर जनतेला मिळाले.


एकीकडे पाणी वितरण व्यवस्था पालिका प्रशासनाकडे असल्याचे एमआयडीसी विभागाकडून सांगण्यात येते. तर दुसरीकडे पालिका प्रशासन २७ गावांना मुबलक  पाणी देण्यास अपयशी ठरल्याचे दिसते.पाणी प्रश्नावर भाजप व मनसेने पालिकेच्या कल्याण मुख्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र तरीही २७ गावे तहाणलेलेच राहिले.अखेर या गावांसाठी सोमवारपासून एका मनसैनिकाने नांदीवली टेकडीवर आमरण उपोषण सुरू केले आहे.


दुपारी 3 वाजेपर्यत पालिकेचा एकही अधिकाराची विचारपूस करण्यासाठी आला नसल्याचे मनसैनिकाने सांगितले.
 डोळ्यात पाणी आले , नळात पाणी कधी येणार ? असा प्रश्न उपस्थित करत मनसे रस्ते आस्थापना डोंबिवली शहर अध्यक्ष ओम लोके याने सोमवारपासून डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली टेकडीवर आमरण उपोषण सुरू केले आहे.पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालिका अधिकारी व  एमआयसीडी अधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाल्या.


कधी तांत्रिक बिघाड, अडचणी अशी अनेक कारणे पुढे करून चालढकल करण्यात अधिकारी वर्ग वेळकाढू भूमिका घेत असल्याने नागरिक संतप्त झाले होते.२७ गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी चर्चा, आंदोलने, मोर्चे काढूनही प्रशासन २७ गावांची तहान भागवू शकत नसल्याने मनसैनिकाने आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला.


याबाबत उपोषणास बसलेले मनसैनिक लोके यांना विचारले असता ते म्हणाले, नांदीवली, भोपर, देसलेपाडा, सांगावं येथील मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पैसे खर्च करून पाण्याचे टँकर मागवावे लागतात.पालिका प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यावर आठ-दहा दिवस पाणी पुरवठा व्यवस्थित होतो.त्यानंतर पुन्हा परिस्थिती 'जैसे से थै' राहते.आता मात्र याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आमरण उपोषण केले आहे.पाणी पुरवठा व्यवस्थित करा अशी आमची मागणी आहे.


चौकट

मुख्यतःदेसलेपाडा, नांदीवली, भोपर ही तिने इतर गावांच्या तुलनेने अधिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहे.७ मे रोजी देसलेपाडा येथील गायकवाड कुटूंबातील ५ जण खदानीत बुडून मृत्यू पावले होते.मात्र अद्याप या गावातील पाणी प्रश्न दूर झाला नसल्याने अजून किती लोकांचा जीव गेल्यावर सरकार २७ गावांना पाणी मिळणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

Post a Comment

0 Comments