भाजप आणि बिंदुरा फाउंडेशनच्या वतीने दिव्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन५०० हून अधिक तरुण तरुणाचा सहभाग


कल्याण : भारतीय जनता पार्टी व बिंदूरा फाउंडेशनच्या सहकार्याने दिव्यातील  तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने रोजगार मेळावा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५०० हून अधिक तरुण तरुणींनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला. 


     कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळले असूनयामध्ये नागरिकांना आधार देण्यासाठी या रोजगार मेळाव्याचे रविवारी दिवा येथील एस. एम. जी शाळेजवळ, सिद्धी विनायक बिल्डींग येथे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विविध प्रकारच्या १० ते १५ कंपन्या उपस्थित होत्या. 


         मेळाव्याचे उद्घाटन भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. बिंदुरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा ऍड. बिंदू दुबे, दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडेमहिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील, अंकुश मढवी यांनी हे शिबिर दिवा मंडळ पदाधिकारी यांच्या सहकार्याने आयोजित केले.


        यावेळी ठाणे शहर कार्यकारणी सदस्य विजय भोईर, समीर चव्हाण, युवराज यादव, राजकांत पाटील, अमरनाथ गुप्ता, समशेर यादव, अशोक सोळंकी, राहुल साहू, डॉक्टर आघाडी अध्यक्ष विद्यासागर दुबे, उत्तर भारतीय अध्यक्ष अजय सिंग, गुजराती सेल अध्यक्ष रमेश मोरा, अवधराज राजभर आदी कार्येकर्ते उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments