लोकनेते दिबांची चित्रफित गावोगावी दाखवणार - माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची ग्वाहीकल्याण : २४ जून हा लोकनेते दि.बा.पाटील यांचा स्मृतिदिन दरवर्षी साजरा होतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लागावे म्हणून येथिल भूमिपुत्र अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत.आगरी समाज मंदिर सभागृह-डोंबिवली येथे 'दिबा स्मृतिदिन पूर्वतयारीया निमित्त बैठक पार पडली. या वेळी बोलताना माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी 'शिवछत्रपतींचा दिबाह्या लघुपटाची प्रशंसा केली. सदर चित्रफित गावो गावी दाखवायचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.


 नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव लागे पर्यंत लढा द्यावा लागेल या साठी जनजाग्रुती करण्यास सदर चित्रफित उपयोगी पडेल असेही त्यांनी सांगीतले. या बैठकीस सर्व पक्षीय कृतीसमितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणेआजी माजी लोकप्रतिनीधी, नगरसेवक, या लघुचित्रपटाचे लेखक मोरेश्वर पाटील व समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments