राज्यसभा निवडणूक निकाला नंतर कल्याण मध्ये भाजपाचा जल्लोष


कल्याण : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर कल्याणमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेत्तृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत पेढे वाटून आनंद साजरा केला.


महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तीन्ही उमेदवारांना प्रचंड घवघवीत यश मिळाल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्ह्याच्या वतीने प्रचंड जल्लोष करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करून कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नागरिकांना पेढे वाटून फटाके वाजवून गुलाल उधळून भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.


लोकांच्या मनामध्ये जे होते ते महाराष्ट्रात झालं असून लोकांच्या मनातला निर्णय झाला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत महापौर भाजपचाच महापौर बसणार यात तिळमात्र शंका नसल्याचे मत जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केले. तसेच जनता या सरकारला पूर्णपणे कंटाळली आहे. हे सरकार म्हणजे अस्ताव्यस्त सरकार असून केवळ सरकार वाचवण्यासाठी यांची धडपड सुरू असते. हे जनतेला आता लक्षात आले असून आगामी कल्याण डोंबिवली निवडणूकीत भाजपचा महापौर होणार हे शंभर टक्के असा दावाही शशिकांत कांबळे यांनी केला.


यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे नेतृत्वाखाली प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष नंदू परब, संजय मोरे, प्रेमनाथ म्हात्रे, शक्तिवान भोईर, नगरसेवक मनोज रायप्रिया शर्मा, प्रिती दिक्षित, सुधीर भगत, शत्रुघ्न भोईर, दिपक दोरलेकर, तेजस केंबारे, नितेश म्हात्रे सौरभ गणात्रा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments