एस एस टी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील रिसर्च कन्व्हेन्शनचे आयोजन


कल्याण :  एस एस टी महाविद्यालय आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असते. विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास व्हावा आणि शिक्षकांचे ज्ञान ही अद्ययावत व्हावे या उद्देशाने महाविद्यालय विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. आजच्या काळामध्ये विषयाच्या ज्ञाना सोबतच  विद्यार्थ्यांमध्ये संशोधन कौशल्य विकसित होणे गरजेचे झालेले आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयाने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील  नवप्रवर्तन रिसर्च कन्व्हेन्शन केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालया सोबत मिळून आयोजित केले.


 या कन्वेंशन मध्ये देशभरातून 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले संशोधन पेपर पाठविले. ह्यापैकी अंतिम फेरीसाठी 65 संशोधन पेपरची निवड करण्यात आली आणि त्यांचे सादरीकरण झाले. विविध नाविन्यपूर्ण विषयांवर संशोधन करून संशोधकांनी त्यांना प्राप्त झालेले निष्कर्ष सर्वांसमोर मांडले. या संशोधनाचा उपयोग भविष्यामध्ये निश्चितपणे सर्वांना होईल असे प्रतिपादन एमएचआरडी  जी ए डी चे संचालक  डॉ. ए. के. बक्षी यांनी  केले.


या कन्व्हेंशन च्या समारोपप्रसंगी डॉ.ए. के. बक्षी यांच्यासोबत जी ए डी सहसंचालिका आणि प्रकल्प प्रमुख प्रा. विमल रहा, एस एस टी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरस्वानी, चेन्नई च्या द्वारकादास कॉलेज चे आणि रिसर्च कन्व्हेंशन च्या एडवायसरी कमिटी चे चेअरमन डॉ. टी वेलमुरूगन, सौदी अरेबिया च्या किंग खालिद विद्यापीठातील डॉ अर्शी नेम, ओमान येथील विद्यापीठाचे डॉ थिरुमुरुगन , मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स चे डॉ हिरेन दांड, केरळ येथील डॉ एनी बेबी , भारत माता कॉलेज ऐरनाकुलम, केरळ येथील डॉ जॉन अब्राहम हे ही उपस्थित होते. 


विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वेगवेगळ्या झालेल्या पेपर प्रेझेंटेशन मधून उत्कृष्ट संशोधन पेपरला रोख बक्षीसही देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये प्रथम बक्षीस कशिष कपूर हिला  तर द्वितीय बक्षीस रेश्माला देण्यात आले. शिक्षकांमधून प्रथम बक्षीस  प्रा.अमृथा वल्ली यांना तर द्वितीय बक्षीस प्रा. दीपक गवादे  यांना देण्यात आले. शिक्षकांमधून सर्टिफिकेट ऑफ मेरिट प्रा. सुनील शहा यांना प्राप्त झाले तर विद्यार्थ्यांमधून सर्टिफिकेट ऑफ मेरिट राहुल चव्हाण याला देण्यात आले. 


यावेळी प्रतिक्रिया देताना संशोधकांनी सांगितले की या कन्वेंशन मुळे त्यांच्यातील संशोधनाचीआवड अधिक वृद्धिंगत झाली आणि भविष्यात आणखीन नवीन संशोधन करण्यासाठी प्रेरणा मिळाली. हे नवप्रवर्तन रिसर्च कन्व्हेन्शन यशस्वी करण्यासाठी एस एस महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आणि आई टी सी एस विभागाच्या को ओरडीनेटर सी कल्पना यांनी आपल्या  सहकार्‍यांसोबत मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments