ठाणे ते दिवा परिसरातील ४ शिबिरांसह मुंबई महानगर प्रदेशात ५७ शिबिरांचे आयोजन

संत निरंकारी मिशनमार्फत मानवतेला समर्पित आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभर साजरा...


कल्याण : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादांनी संत निरंकारी मिशन मार्फत यावर्षी मानवतेला समर्पित आंतरराष्ट्रीय योग दिवस’ चे आयोजन दिनांक 21 जून, 2022 रोजी संपूर्ण भारतवर्षातील विविध क्षेत्रांमध्ये करण्यात आले. यासाठी स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरंकारी सत्संग भवनांमध्ये, मोकळ्या जागांवर तसेच उद्यानांमध्ये ही योग शिबिरे आयोजित करण्यात आली.      ठाणे ते दिवा भागात चार शिबिरे आयोजित करण्यात आली. या चार शिबिरांसह मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये एकंदर ५७ ठिकाणी अशा प्रकारची योग शिबिरे आयोजित करण्यात आली.  ठाण्यामध्ये वागले इस्टेटकळवामनोरमा नगर आणि दिवा याठिकाणी हे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरंकारी भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन योगाभ्यास केला.      नवी मुंबईत ऐरोली ते पनवेल तसेच उरण परिसरात एकंदर १४ योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये साठे नगर-दिघाऐरोली सेक्टर-१कोपरखैरणे, वाशीसानपाडाशिरवणेनेरुळखारघरनावडा गांवकामोठेकळंबोलीपनवेलउरण व विधणे आदि ठिकाणांचा समावेश होता. याशिवाय बृहन्मुंबईठाणेडोंबिवलीकल्याणउल्हासनगरबदलापुर आदि भागांमध्ये जवळपास ५३ ठिकाणी सुबह या योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला.      मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून सन २०१५ पासूनच योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे आयोजन संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात करण्यात आले.

Post a Comment

0 Comments