भिवंडी दि 8(प्रतिनिधी )शहरातील विविध परिसरात पाणी वेळेवर येत नाही, काही ठिकाणी दोन, तीन दिवसांनी पाणी येते तर काही ठिकाणी दूषित पाणी येत असताना नागरिकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या.
तरी सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांनी अखेर समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष रियाज़ आज़मी यांच्या कडे पाणी समस्या मांडल्या त्यामुळे बुधवारी दुपारी समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष रियाज़ आज़मी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिलांनी हातात मटके घेऊन घोषणा बाजी करीत महापालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य "जल आक्रोश मोर्चा" आपल्या समस्या मांडल्या यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता अखेर महापालिका प्रशासनाने अश्वासन दिल्याने मोर्चाची सांगता झाली आहे..
0 Comments