स.वा .जोशी शाळेत योग दिन साजरा

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) 21 जून रोजी 6 महाराष्ट्र बटालियन NCC मुंबई ग्रुप 'A' NCC Unit :- ज.ए.इ.चे स.वा. जोशी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डोंबिवली पूर्व येथे आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. योग दिनात विविध योग मुद्रा, सूर्यनमस्कार, योगासने केली.


या कार्यक्रमात स.वा.जोशी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती लोहार ,पर्यवेक्षिका संगीता दामले तसेच संस्थेचे संचालक मंडळ सदस्य विकास पुराणिक , गजानन बागुल उपस्थित होते. उपस्थितांनी योगासनेही केले व योगासनाचे महत्त्व सांगितले.


या कार्यक्रमात NCC Unit चे ३९ कॅडेट्स सहभागी झाले होते. तसेच या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ही सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन एनसीसी ऑफिसर रविंद्र देवकते यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments