दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स उत्साही वातावरणात प्रारंभ

२०२५  मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी हिंदूंनो आजपासून कृतीशील व्हा  -  सद्गुरु(डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती  


कल्याण : दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स उत्साही वातावरणात प्रारंभ झाला असून २०२५  मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी हिंदूंनो आजपासून कृतीशील व्हा असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु(डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.


शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर देशभरात धर्मांधांनी चालू केलेला हिंसाचार पहाता, संपूर्ण शासन व्यवस्था हिंदु हिताची होत नाही, तोपर्यंत हिंदु राष्ट्रासाठी आपल्याला लढा द्यावाच लागेल. ‘वाराणसीतील नंदी आजही  ज्ञानव्यापी मशिदीकडे तोंड करून मूळ विध्वंसित मंदिराचे भग्नावशेष पहातो आहे. 


        कर्नाटकमध्ये  ‘पहले हिजाब, बाद मे किताब’ अशी मोहीमच विद्यार्थिनींच्या माध्यमातून कट्टरतावाद्यांनी चालू केली होती. उच्च न्यायालयाने त्या विरोधात निर्णय दिल्यानंतरही हिजाबची मागणी करणार्‍या मुसलमानांना ‘कुराण श्रेष्ठ कि देशाचे संविधान ?’, हा प्रश्न विचारण्याचे धाडस देशातील एकाही ‘सेक्युलर’वाद्याला झाले नाही. हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अयोग्य कसे ? तो आमचा नैसर्गिक आणि घटनात्मक अधिकार आहे.


      सध्या भारतात कार्यरत हिंदुविरोधी ‘अलायन्स’च्या मागे राजकीय स्वार्थ आहे. हा ‘अजेंडा’ हिंदु राष्ट्रासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे.  या हिंदुविरोधी ‘अलायन्स’ला पराभूत करण्यासाठी आपल्याला येणार्‍या काळात वैचारिक आणि बौद्धीक स्तरावर सातत्याने खंडण करावे लागेल. त्यादृष्टीने हे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ महत्त्वपूर्ण आहे. 


        कालमहिम्यानुसार वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे, त्यासाठी हिंदूंनो आतापासूनच कृतीशील व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे* यांनी केले. ते ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या अधिवेशनात देशविदेशातून, तसेच भारतातील विविध राज्यांतील २२५ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. 


या वेळी हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत *‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण - ‘हलाल जिहाद ?’* या मराठी आणि हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन व्यासपिठावर उपस्थित असणारे ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे संरक्षक तथा सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता  हरि शंकर जैन, ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी संयुक्तानंद महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज आणि समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.


        अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. यानंतर व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर वेदमंत्रांचे पठण झाले. या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.


         ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी ‘‘हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प काही वर्षांत पूर्ण होईल’, असे दिलेले आशीर्वचन चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. 

Post a Comment

0 Comments