डोंबिवलीतून शेकडो शिवसैनिक अयोध्येला रवाना

  


डोंबिवली ( शंकर जाधव ) युवासेना प्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 
ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री,नगरविकास मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार १३ जून रोजी दुपारी १ वाजता ठाणे स्टेशन येथून अयोध्या येथे रवाना झाले.


यात डोंबिवलीत सुमारे ४०० शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले.शिवसेना डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे आणि शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जय घोष केला.यावेळी शिवसेना पदाधिकारी सतीश मोडक,सुधीर पाटील, अमोल पाटील, विवेक खामकर, अरविंद बिरमोळे  यांसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


यावेळी मोरे म्हणाले, याआधी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता.आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही अयोध्येला जात आहे.अयोध्येला जाणे हि प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा असते.

Post a Comment

0 Comments