भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांमुळे मिळाली महत्वाची कागदपत्रे

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजयुमो डोंबिवली पूर्व चे उपाध्यक्ष रुपेश पवार यांना रस्त्यावर  एक पाकीट  सापडली होते.रुपेशने पाकीटबाबत चौकशी केली असता हे पाकीट लक्ष्मण बाविस्कर व आबाजी महाजन यांचे असल्याची माहिती मिळाली.पाकिटात महत्वाची कागदपत्रे होते.भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी बाविस्कर व महाजन यांची भेट घेऊन पाकीट परत दिले.


या व्यक्तींचे मोबाईल व पर्स चोरीला गेले होते.भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे ह्यांच्या मार्गदर्शन नुसार, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर ह्यांच्या उपस्थितीत ते कागदपत्रे व पाकीट देताना बाविस्कर व महाजन यांनी भाजप युवा मोर्च्याचे आभार मानले.


भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई यांनी युवा कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक आहे असे सांगून युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी नेहमीच समाजात सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments