कल्याण मध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून चार जण जखमी


कल्याण :  कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई  चौकातील माणिक कॉलनी इमारतीची  लिफ्ट कोसळल्याने  चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजता घडली.


माणिक कॉलनी ही बहुमजली मोठी इमारत आहे. या इमारतीच्या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. दुरुस्ती सुरु असताना लिफ्ट कोसळली. त्या लिफ्टमध्ये दुरुस्तीचे काम करणारे चार कर्मचारी होती. लिफ्ट कोसळल्याचा जोरदार आवाज होताच इमारतीच्या सुरक्षा रक्षकासह अन्य नागरीकांनी लिफ्टच्या दिशेने धाव घेतली.


लिफ्टमध्ये अडकलेल्या चारही कर्मचा:यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. चारही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती इमारतीच्या रहिवासीयांनी दिली आहे. जखमी झालेल्या कर्मचा:यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments