कल्याण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मिलापनगर रेसिडेंटस वेलफेअर असोसिएशनतर्फे वृक्षांवर पिना, खिळे, तार ठोकून लावलेल्या जाहिराती फलक काढून टाकून झाडांना यातून मोकळे करणे या उद्देशाने एक पर्यावरण कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी मिलापनगर, एमआयडीसी मधील सर्व वृक्षांवरील फलक काढून टाकण्यात आले. सुमारे शंभरहून अधिक झाडांचे १३० फलक काढून ते गोणीत भरून केडीएमसीच्या सुखा कचरा गाडीत देण्यात आले.
यापुढे अश्या जाहिराती फलक लावणाऱ्याना असे फलक लाऊ नये याची समज देण्यात येईल. शिवाय त्यांची तक्रार केडीएमसी, पोलीस प्रशासनाकडे करण्यात येईल. जर पुन्हा असे झाडांवर फलक लागले गेले तर असे फलक काढण्याचे कार्यक्रम काही दिवसांनी पुन्हा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या उपक्रमात वर्षा महाडिक, राजु नलावडे, प्रसाद कांत, निखिल कुलकर्णी, अरविंद टिकेकर, सुधीर गाडेकर, संजय गोगटे, पुष्कर लोहोकरे, समीर व स्नेहा नाईक, माधव सिंग, निखिल लाटकर, मुकुंद कुलकर्णी, सुहास व सुहासिनी वाळके, मंथन नाईक, शैवी कांत, रुपेश आंब्रे, रुपेश कोलापटे आदी रहिवासी सहभागी झाले होते.
0 Comments