तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी केली सात जणांना अटक

इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन तरुणीने केली होती आत्महत्या / लैगिंक अत्याचार करुन व्हीडीओ व्हायरल करण्याची तरुणीला दिली होती धमकी


कल्याण : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खळबळजनक घटना घडली आहे. लैगिंक अत्याचार करुन व्हीडीओ व्हायरल करण्याची तरुणीला धमकी दिल्याने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन तरुणीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.


दीड वर्षापासून एका तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. आपल्यावर होत असलेले अत्याचार ती तरुणी सहन करु शकली नाही. तिने तिच्या राहत्या घराच्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या मोबाईल तपासणीनंतर जे सत्य समोर आले. ते भयानक आहे. अखेर या प्रकरणात लैगिंक अत्याचार करणा:या सात तरुणांना अटक केली असून एका तरुणीचा पोलिस शोध घेत आहेत.


कल्याण काटेमानिवली परिसरात दोन दिवसापूर्वी एका १८ वर्षीय तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल करुन तपास सुरु केली. तरुणीच्या मोबाईलमधील नोटपॅडवर तिने तिची व्यथा मांडली होती. बारावीत ७१ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालेली तरुणी एफवायच्या वर्गात प्रवेश घेणार होती मात्र तिने आत्महत्या केली. तिच्यासोबत लैगिंक अत्याचार करण्यात आला. दीड वर्षापासून हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी या प्रकरणात तपासाचे चक्र फिरविले आणि या प्रकरणी सात आरोपींना बेडया ठोकल्या आहेत. विजय यादवप्रमेय जयेश तिवारीकृष्णा जैसवाल, सन्नी उर्फ निमेश ठाकूर, आनंद दुबे, शिवम पांडे, निखिल मिश्रा यांना अटक केली आहे. तर काजल जैयस्वाल या तरुणीचा पोलिस शोध घेत आहेत.


पिडित तरुणीच्या आई वडिलांचा आरोप आहे कीआरोपी हे धनाडय़ कुटुंबातील आहे. त्यांच्याकडून आमच्यावर दबाब आणला जात आहे. पोलिसांनी आम्हाला सुरक्षितता पुरविली पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. याबाबत शिवसेनेच्या महिला शिष्टमंडळाने पोलिासांची भेट घेतली. या प्रकरणात ३०६ अंतर्गत गुन्हा दाखळ करण्यात आला. पोलिसांनी लैगिंक अत्याचाराचे कलम लावले पाहिजे. नाही तर आम्ही आंदोलन करु असा इशारा दिला आहे.


आरोपी विजय यादव याने त्याच्या मोबाईल मध्ये अश्लिल फोटो व व्हिडीओ काढ़न ते इतर आरोपीना दाखविले व या तरुणीला ब्लेकमेल करून आरोपी प्रमेय तिवरी, कृष्णा जैयस्वाल, सन्नी उर्फ निमेश ठाकूर, आनंद दुबे, शिवम पांडे यांनी मयत मुलगी हीचा सन २०१८ पासून इमारतीच्या टेरेसवर शारीरीकमानसिकलैगिंक छळ करीत होते. आरोपी  निखिल मिश्रा व काजल जैयस्वाल हे इतर आरोपींना मदत करीत होते म्हणून स्नेहा ही काही दिवसापासुन मानसिक तणावाखाली होती. याच तणावातून या तरुणीने आत्महत्येचे पाउल उचलले असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली.


Post a Comment

0 Comments