त्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळण्यासाठी कल्याण पुर्वेत मोर्चा


कल्याण : एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच सात मित्रांकडून मागील दीड वर्षापासून होत असलेल्या लैगिंक अत्याचाराला कंटाळून त्या मुलीने मागील आठवड्यात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी सात तरुणांसह तिच्या एका मैत्रिणीला अटक केली. हे आठ जण सध्या पोलिस कोठडीत आहेत.


आतमहत्या केलेल्या केलेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी कल्याण पूर्वेतील तरुणांनी रविवारी चक्कीनाका ते कोळसेवाडी पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. मयत तरुणीला न्याय मिळावा अशी मोर्चेकऱ्यांनी मागणी केली. या मोर्चात हजारो तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments