श्री साई एकविरा प्रतिष्ठान वाडेघर शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्नवा डेघर श्री सुरज पाटील तर वाडेघर श्रीमान सुनील गायकर


कल्याण : श्री साई एकविरा प्रतिष्ठान वाडेघर व नमस्कार मंडळ व्यायामशाळा यांच्या वतीने दोन दिवसीय बॉडी बिल्डींग वाडेघर श्री व बेंचप्रेस डेडलिफ्ट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन साई एकविरा प्रतिष्ठान वाडेघरचे महेश पाटील, मंडळाचे सदस्य यांच्याकडून यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.


बॉडी बिल्डींग वाडेघर श्री किताब सुरज पाटील यांनी तर वाडेघर श्रीमान सुनील गायकर यांनी पटकाविला. बेंचप्रेस स्पर्धेत चंद्रकांत तरे हे विजयी ठरले. डेडलिफ्ट स्पर्धेत स्ट्रॉंगमॅन मानकरी मेघनाथ भामरे, तर महिला गटात स्ट्रॉंगवुमन किताब दुर्गा वाघे हिने पटकावला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक जयवंत भोईर, समाजसेवक नरेश नाईक, मनोज व्यापारी, नरेश पाटील, रवी पाटील, तुषार जाधव, नारायण गायकर, नमस्कार मंडळाचे उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी, सचिव प्रकाश गद्रे, समिश जोशी, डॉ. प्रशांत पिंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेसाठी नवीन जगे, संजय मोरे, सुनील गायकवाड, राष्ट्रीय पंच विनायक कारभारी, जिल्हास्तरीय पंच सुश्मिता देशमुख, निलेश भोईर, निलेश देशमुख, प्रथमेश भालेकर आदींनी पंच म्हणून काम पाहिले.  


Post a Comment

0 Comments