कल्याण पश्चिमेतील राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने वाहतूकीचा खोळंबा सुदैवाने जिवित हानी टळली

                                     


ल्याण  :- राष्ट्रीय महामार्गावर बिर्ला काँलेज जवळील मिलिंद नगर काँर्नर परिसरात पावसात रात्री साडे आठ च्या सुमारास रस्यात्यात झाड पडल्याने दोन रिक्क्षाची हानी झाली. सुदैवाने जिवित हानी टळली.    

             कल्याण पश्चिमेतील राष्ट्रीय महामार्ग वर  मिलिंद नगर काँर्नर नजीक बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कल्याण कडे जाणर्या भर रस्त्यात झाड पडल्याची घटना घडली. यामध्ये दोन रिक्क्षाचे नुकसान झाल्याचे समजते.


           सुदैवाने जिवित हानी टळली घटनास्थळी क.डो.मनपा अग्निशमन दलाने धाव घेत झाड बाजुला काढण्याचे काम सुरू केले. झाड पडल्याने कल्याण  तसेच शहाडकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा सुमारे एक तास झाला होता.

Post a Comment

0 Comments