आंतरराष्ट्रीय योग दिन: वी कॅन वी विल फाऊंडेशनच्या मुलांनी ग्रोवेल्स १०१ मॉलमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली


शरीर, मन आणि आत्मा निरोगी राखण्यासाठी योग करण्याचा दिला संदेश ~

 

मुंबई, २० जून २०२२: शरीर सुदृढ आणि मन ताणरहित ठेवण्यासाठी दररोज योग करणे हा आपल्या सर्वांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे यात काहीच शंका नाही. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत वी कॅन वी विल फाऊंडेशनच्या जवळपास ३० मुलांनी आवश्यक योग मुद्रांची प्रात्यक्षिके सादर केली. कांदिवलीमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेल्या, कुटुंबासह खरेदी, मौजमजा करण्यासाठी पसंतीचे ठिकाण बनलेल्या ग्रोवेल्स १०१ मॉलमध्ये हा उपक्रम पार पडला.

 


आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग म्हणून योग स्वीकारला पाहिजे हा संदेश देत या मुलांनी १५ पेक्षा जास्त आसने यावेळी करून दाखवली. ताडासन, वक्रासन, हस्तपादासन, पर्वतासन, पश्चिमोत्तासन, सेतू बंधासन आणि भुजंगासन यासारख्या आसनांचा त्यामध्ये समावेश होता. ग्रोवेल्स १०१ मॉलमध्ये त्यावेळी उपस्थित असलेल्या अनेक ग्राहकांनी हा उपक्रम पाहिला, इतकेच नव्हे तर, मुलांसोबत आसने देखील केली.

 


योग प्रात्यक्षिके सादर केल्यानंतर या मुलांनी मॉलमध्ये मौजमजा केली व त्यांना फूड कोर्टमधील पदार्थांचा देखील आस्वाद घेता आला. ग्रोवेल्स १०१ मॉलने मुलांना छत्र्या भेट म्हणून दिल्या आणि फाऊंडेशन ट्रस्टला काही मदत देखील दिली.

 


आयुष्य घडवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या मुलांसाठी अधिक चांगल्या संधी व शक्यता निर्माण करण्यात मदत करू शकतील अशा व्यक्तींचा समूह उभा करण्याच्या उद्देशाने पंकज ठक्कर यांनी वी कॅन वी विल फाऊंडेशनची स्थापना केली. फाऊंडेशनचे काम प्रशिक्षित स्वयंसेवक व असोसिएट्सच्या नेटवर्कमार्फत सांभाळले जाते ज्यांनी दर आठवड्याला ३०० पेक्षा जास्त मुलांच्या जीवनावर प्रभाव निर्माण करणारे विविध प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत.

 


आपल्या संचालन क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरात आणि एकंदरीत समाजात कल्याणकारी कामांमध्ये सक्रिय भूमिका निभावण्यासाठी ग्रोवेल्स १०१ मॉल वचनबद्ध आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना अँटी-पोल्युशन मास्क्स मदत म्हणून पुरवणे, एसजीएनपीच्या आदिवासींना सौर दिवे मदत म्हणून पुरवण्यात मदत करण्यासाठी ग्राहकांना सामावून घेणे, मॉलच्या प्रवेशद्वारासमोरील फ्लायओव्हर भिंतीचे सुशोभीकरण असे अनेक सामाजिक उपक्रम ग्रोवेल्स १०१ मॉलमार्फत राबवले जात असतात.

Post a Comment

0 Comments