पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महिलेचे आमरण उपोषण सुरू..डोंबिवली ( शंकर जाधव ) २७ गाव पालिकेत समाविष्ट होऊनही तहाणलेले असून पाणी टंचाईचा सामना करून नागरिक संतापले आहेत.,मोर्चे , आंदोलने, लाक्षणिक उपोषण करूनही पाणी समस्या दूर होत नाही याकरता डोंबिवलीतील एका महिलेने आमरण उपोषण सुरू केले आहे.


उपोषण सुरू करण्यासाठी   सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन 27 गावांना पाणी मिळू दे अशी प्रार्थना केली.डोंबिवली पूर्वेकडील देशमुख होम्स मधील राहणाऱ्या सोनावणे यांचे आमरण उपोषण 27 गावातील पाणी प्रश्न सोडवू शकेल का पुन्हा सोनावणे यांना पालिका अधिकारी आश्वासन देतील हे समजेल.

Post a Comment

0 Comments