भिवंडीत सडक्या फळांचा ज्युस काढणाऱ्या विक्रेत्याचा व्हिड़ीओ व्हायरल..


भिवंडी दि 18 (प्रतिनिधी ) रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात  फळांचा ज्यूस विकणाऱ्या विक्रेता सडलेल्या फळांपासून ज्युस तयार करीत असल्याचा खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कल्याण - भिवंडी मार्गावरील साईबाबा मंदिराच्या शेजारी असलेल्या ज्युस सेंटरचा असल्याचे समोर आले आहे. 

नागरिकांच्या आरोग्याला धोका..


भिवंडीत राहणारे  काही दक्ष  तरुण त्या ज्युस सेंटर गेले होते. त्यावेळी त्या तरुणाचे ज्युस सेंटर वरील ठेवलेल्या विविध फळांकडे लक्ष गेले असता त्यामध्ये काही सडके फळही असल्याने त्या तरुणांनी त्या सडलेल्या फळांचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून तो व्हायरल केल्याने हि घटना समोर आली आहे. . या व्हिडिओ मध्ये ज्युस विक्रेता  हातात सडलेले अननस दिसत आहे.


           सदरील ज्यूस सेंटर चालक या अननसाचं ज्यूस बनवत होता. असा दावा व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या तरुणाने केला आहे. शरीराला चांगला थंडावा मिळावा म्हणून आपण ज्यूस पिण्यासाठी जातो मात्र. ज्यूस सेंटर चालक कशा पद्धतीने सडक्या फळांचा वापर करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहेत. हे व्हायरल व्हिडिओतून दिसून येते.


सेंटर बंद करण्यास भाग पाडले. ..

विशेष  म्हणजे जेव्हा हा तरुण  व्हिडिओ तयार करीत होता. तेव्हा ज्यूस सेंटरच्या कामगाराने हे अननस फेकून दिले आहेत. दुसरीकडे हा व्हिडिओ समोर येताच परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.


           त्यानंतर काही वेळाने ज्युस सेंटरवर गोधंळ उडाला असता आणखी काही तरुण या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्यूस सेंटर चालकाला सेंटर बंद करण्यास भाग पाडले. शिवाय त्याच्या डोक्यावर सडक्या फळांचा ज्युस ओतल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

Post a Comment

0 Comments