देशमुख होम्स परिसराचा पाणीप्रश्न मिटणार कुणाल पाटील यांचे आश्वासन अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकणार


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या देशमुख होम्स परिसराचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे आश्वासन माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरिकांना दिले आहे.कल्याण ग्रामीणमधील टाटा नाका येथील देशमुख होम्स येथे तिन हजार कुटुंबांना गेल्या ५ वर्षापासून पाणी समस्या भेडसावत आहे.  देशमुख होम्स च्या रहिवाशांना पाण्याच्या समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. कल्याण - डोंबिवली महानगरपालिकाक्षेत्रामध्ये शहरी भागात व्यवस्थित पाणीपुरवठा सुरु असून केवळ देशमुख होम्सला पाणी समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी कुणाल पाटील यांनी याठिकाणी भेट देऊन नागरिकांसोबत पाणी प्रश्नांसंदर्भांत चर्चा केली. आजही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना या संबंधित फोन द्वारे माहिती दिली असता  लवकरच यासंबंधी देशमुख होम्स साठी अमृत योजने अंतर्गत लवकरच जलवाहिनी टाकून नागरिकांना पाणी प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वाशित करण्यात आले. यावेळी समाजसेवक अनिल पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments